Saturday, April 11, 2020

Jokes Of Aryan

Jokes Of Aryan :

(. At Corona lockdown time )
१. Rahul : bar zale aaple pm Modi आहेत , नाहीतर राहुल गांधी असता तर किती लोक मेले च असते.

आर्यन : राहुल गांधी pm aahe , he aikunch Lok aajari पडले असते 😆😆😆😊😊☺️

Monday, May 30, 2016

राजा यश्मित

   मे महिन्याच्या सुट्टीत यश्मित ठाण्याला राहायला आला . मूर्ति लहान पण कीर्ति महान असा आहे हा ! खुप बोलका आहे . जसा बोलका तसाच हुशार सुद्धा . एकदा सांगितले की ते त्याच्या डोक्यात फिक्स होतच.
   मी त्याला गमतीने घरातल्या कुलरचे पाणी lickage आहे ना , तर आपण त्याला tub मध्ये उभे करून ठेवू , ऎसे म्हटले . त्या बाळाने हे perfect ध्यानात ठेवून दूसर्यादिवशी रात्रि मी कूलर जवळ असता मला , ह्याला tub मध्ये ठेवायचे आहे ना ! अशी मलाच आठवण करून दिली .
   ह्याच्या हुशारीचे किस्से अगदी दिवसाला सरासरी 100 ने असतात .
   त्याच्या मावशीला म्हणजे माझ्या आईला,  तो kitchen च्या कामात तर खुप मदत पण करतो . अगदी काल तो गाजर आणि काकड़ी किसायला लागला आणि खुप छान किसुन दिली . किसनी कशी पकडायची असते हे त्याला आईने एकदाच सांगितले पण दूसर्यादिवशी त्याने अचूक पकडली ती !
   रोज आम्ही घरी शताक्षि प्रसादम खातो . तो रोज हा प्रसाद मागून खाऊ लागला . ठाणे ला आल्यावर जशी त्याची मज्जा होती तशीच संस्कार शिबिर पण घरात होती ;जैसे उठल्यावर आणि रात्रि झोपताना दांत घासने , जेवताना ताट संपूर्ण जेवणे , कैसे जेवावे , जेवनापूर्वी ' वदनि कवळी घेता ' म्हणावे , आई ला कामात मदत करावी , आणि खुप काही !!
   रोज रात्रि मी हनुमान चालीसा म्हणूनच डोळे बंद करतो हे त्याने पाहिले आणि मग दिवसभर इकडून तिकडे उड्या मारणारा मोगली यश्मित शांतपणे माझ्या बाजूला बसून हनुमान चालीसा बोलायचा , हे पाहुन मीच shock होत असे . योगा मध्ये रोज रात्रि 5 मिनिटे शांत बसा ऎसे म्हटले आहे ,हा पण माझ्या सोबत बसायचा . मी चक्क ह्याला शांत डोळे बंद करुन बसलेला पाहिले , आणि मी ध्यान हरवून बसलो .
   रोज सकाळी न रडता उठणार , अंघोळ ज़ाली की स्वताची इनरवेयर स्वतः धुणार . सकाळी मझ्यासोबत व्यायाम करणार , अजुन काय बोलू !!
यश्मित ला घेऊन मी 2 वेळा 2 वेगवेगळ्या मैदानात खेळायला नेले , मनसोक्त मजा केली त्याने ! घरात stickers चिकटवले आणि फुल on धमाल केली आहे हयाने !!

असा हा यश्मित !
   मी माझे अगदी वैयक्तिक मत असे सांगिन , संगीता माउशी आणि ललित काकाना की , यश्मित आता जणू एक चिकणमाति चा गोळा आहे , जसा आकार दयाल तसा तो वळणार , म्हणून ' त्याला वेळ दया , त्याच्याशी खेळा , बोला आणि त्याचा अभ्यास घ्या , ऎसे केले तर मला खात्री आहे ; यश्मित कधीच वाया नाही जाणार ! '

राहुल गुरव
31/5/2016

Tuesday, June 23, 2015

चड्डी - बनियान gang

 एक number cartoon  . आजची एक गमतीशीर गोष्ट सांगतो . मी रात्री माझ्या second shift वरून घरी आलो . तेव्हा पप्पांनी tv वर बातम्या लावल्या होत्या . " चड्डी - बनियान gang  चा उन्माद ; हि gang मुंबई मध्ये लोकांना भर रात्री लुटते . पहा हि gang कशी चड्डी - बनियान घालून फिरत आहे . police  ह्यांच्या मागावर आहेत , सापडल्यास लगेच police न सांगा " अशी बातमी चालू होती . इतक्यात चड्डी बनियन घालून आर्यन आला . मी आर्यन ला पाहून गमतीने म्हणालो , " आई शप्पथ - हाच तो चड्डी बनियान gang चा माणूस ! थांब मी police  ला fone लावतो . " असे बोलून मी फोन उचलून खोटेच म्हणालो ,"police , इथे एक चड्डी बनियन घालून आला आहे , हो - हो - माझा address आहे ---"
  आर्यन धावत माझ्याकडे आला आणि नको नको म्हणून घाबरून ओरडू लागला . त्याची पुरती फाटली होती . फोन ठेवून मी त्याला बोललो ," जा लवकर shirt  pant घाल नाहीतर police  तुला पकडतील . " हे ऐकून आर्यन जो धावत सुटला तो धाडधाड त्याच्या घराचे दार ठोकू लागला , " पप्पा दरवाजा उघडा लवकर लवकर " असे ओरडू लागला . आम्ही सारे हसून हसून पुरते झालो . मामा ने दरवाजा उघड्ल्याबरोबर आर्यन तडक bedroom  मध्ये गेला आणि कशीबशी pant घातली , shirt नही सापडले तर ओलच  shirt  घातले .
  आणि मग माझ्याकडे आला  म्हणाला , " आला नही न पकडणार "
मी हसत हसत बोललो , " नाही रे वेडू "